जयसूर्याला कुबड्यांचा आधार

0

कोलंबो । श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत तो कुबड्यांच्या आधाराने चालण्याचा प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळतेय. जयसुर्याला सध्या निट उभेदेखील राहता येत नाही, कुबड्यांचा आधार घेतल्याशिवाय त्याला पाऊलही पुढे टाकता येत नाहीये. त्याच्या या अवस्थेकडे बघितल्यानंतर हा तोच खेळाडू आहे का ज्याने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडला होता असा प्रश्‍न पडतोय. जयसूर्याने क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर श्रीलंकेच्या निवड समितीचं अध्यक्षपद देखील भूषवलं होतं, मात्र त्याच्या कार्यकाळातील निर्णयांमुळे संघाच्या कामगिरीवर वाईट परिणाम झाल्याचा डाग त्याच्यावर लावण्यात आला.

जयसूर्याने क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर श्रीलंकेच्या निवड समितीचं अध्यक्षपद देखील भूषवलं होतं, मात्र त्याच्या कार्यकाळातील निर्णयांमुळे संघाच्या कामगिरीवर वाईट परिणाम झाल्याचा ठपका त्याच्यावर लावण्यात आला. श्रीलंकेतील सिलोन टुडे वृत्तपत्राने दिलेल्याा वृत्तानुसार, जयसुर्या गुडघ्याच्या त्रासाने त्रस्त आहे, गुडघ्याचे ऑपरेशन करण्यासाठी त्याला ऑस्ट्रेलियाला जावे लागणार आहे. मेलबर्न इथे शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याच्यावर देखरेखीखाली पुढील उपचार केले जातील, या उपचारांनंतर तो पुन्हा पायावर उभा राहतो की नाही हे कळू शकेल. जयसूर्याच्या तुफानी फलंदाजीसमोर गोलंदाजी करताना भल्या भल्या गोलंदाजांना चांगलाच विचार करायला लागायचा. त्याने 40 च्या सरासरीने 110 टेस्ट कसोटी सामन्यांमध्ये 6973 धावा बनवल्या होत्या तर एकदिवसीय क्रिकेटमधील 433सामन्यांमधून त्याच्या नावावर 13,000 धावा जमा आहेत.