जर आ.एकनाथराव खडसेंनी शब्द टाकला तर धुळ्यात कृषी विद्यापीठ…!

0

धुळे। राज्याचे माजी महसूलमंत्री व उत्तर महाराष्ट्राचे नेते एकनाथराव खडसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना धुळ्यातच कृषी विद्यापीठ स्थापन करा,असा शब्द टाकला तर मुख्यमंत्र्यांना तात्काळ धुळ्यात कृषी विद्यापीठाची घोषणा करावीच लागेल, असे स्पष्ट मत कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीचे निमंत्रक व माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी आज व्ये केले. काल मुंबईहून परतत असताना एकनाथराव खडसे यांनी धुळ्यात कृषी विद्यापीठाचा विषय काढला होता. त्यावर प्रा.पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

आ.खडसेंच्या प्रतिक्रीयेला उत्तर
काल मुंबईहून जळगावकडे जाताना एकनाथराव खडसे काहीकाळ धुळ्यात थांबले होते. धुळ्याचे राजकारण, नियोजित कृषी विद्यापीठ व जिल्ह्याच्या विकास प्रश्‍नांबाबत त्यांनी या भेटीत खडसे म्हणाले होते की, विकासाच्या योजना समन्वयाने घ्यावयाला हव्यात. विद्यापीठाच्या प्रश्‍नावरुन शरद पाटील भांडायला निघायचे. आता त्यांना म्हणावं, कोणाशी लढणार? कृषी विद्यापीठ धुळे अथवा जळगावला झाले असते तरी ते खान्देशातच राहिले असते. आता मला नं तुला घाल…ला! अशी स्थिती आहे. बाकीचे नेते योजना पदरात पाडून घेतात.आपल्याकडे मात्र भांडणातच वेळ जातो, असे खडसे यांनी सांगितले होते. यावर बोलतांना प्रा.पाटील यांनी प्रतिक्रीया दिली.

मा.एकनाथरावजी खडसे यांच्या या विधानांवर प्रा.शरद पाटील यांनी म्हटले आहे की, एकनाथराव खडसे हे खान्देशाचे लढाऊ नेते आहेत. त्यांनी दिलेले योगदान आम्ही विसरु शकत नाही. मात्र विकासाचा अनुशेष भरताना धुळे जिल्हा जळगावपेक्षा निश्‍चित मागासलेला आहे,हे आम्ही वारंवार शासनाला ओरडून सांगत आहोत. खडसे मंत्री मंडळाबाहेर असल्याने खान्देशचे विकासाबाबत नुकसानच होत आहे.खडसे मंत्रिमंडळात असते तर गेल्या वर्षभरात खान्देश अजून पुढे गेला असता. मुख्यमंत्री व सुधीर मुनगुंटीवार यांच्यात एकमत झाल्यामुळे मुल,जि.चंद्रपूर येथे दुसरे कृषी विद्यापीठ स्थापण्यासाठी एकमत झाले आहे. आपण मुख्यमंत्र्यांना दोन ओळींचे पत्र दिले तरी उद्याच धुळ्यात कृषी विद्यापीठ जाहीर होवू शकते. हे श्रेय आपण घेतले तरी चालेल असेही शरद पाटील यांनी म्हटले आहे.