जलपर्णीत अडकलेल्या कुत्र्याच्या पिलास मिळाले जीवदान

0

प्राणीमित्र बडदे यांनी वाचविले प्राण

सांगवी : येथील पवना नदीवरील दशक्रिया विधी घाटाजवळ असलेल्या नदीपात्रामध्ये अडकलेल्या कुत्र्याच्या पिलास जीवदान मिळाले. नदीपात्रातून नदीपात्रात जलपर्णीमधुन लहान कुत्र्याच्या पिलाचा विव्हळण्याचा केविलवाणा आवाज येत होता. नेहमी वर्दळीचा असलेला इंद्रप्रस्थ चौकातील वाहनांच्या आवाजाने कुत्र्याच्या पिल्लाच्या आवाजाची दिशा कळत नव्हती. त्यामुळे पिल्लु कुठे आहे हे कळून येत नव्हते. याच चौकातील शिवामृत वॉशिंग सेंटरपाशी पत्रकार मंडळी होती. त्यांनी प्राणीमित्र पशु वन्य जिव संस्थेच्या विनायक बडदे यांना बोलविले. बडदे यांनी जलपर्णी बाजुला करीत पिलाला बाहेर काढले. रात्रीच्या अंधारात नदीकाठी अन्नाच्या शोधात हे पिल्लु नदीपात्रातील जलपर्णीत अडकले असावे असा अंदाज बडदे यांनी व्यक्त केला.

नदीपात्रातील जलपर्णीतुनच मधुन मधुन कुत्र्याच्या पिलाचा आवाज येत असल्याचे लक्षात येताच दाट जलपर्णीमुळे कुत्र्याचे पिलु नजरेस येत नव्हते. नदीकाठी खेळत खेळत दाट जलपर्णीत अडकुन निपचित पडलेल्या कुत्र्याच्या पिलाचे केविलवाणे विव्हळणे अधुन मधुन शांत होत होते. बडदे यांनी स्थानिक पत्रकार व नागरीकांच्या मदतीने काठ्यांच्या सहाय्याने जलपर्णी हटवुन पिलास बाहेर काढले. पिलास कपड्याच्या सहाय्याने स्वच्छ करून खायला दिले. थोड्याच वेळात हायसे वाटु लागल्याने या पिलाने आईच्या शोधात धुम ठोकली.