जलपर्णीमुक्त अभियानांतंर्गत 2 ट्रक जलपर्णी काढली

0

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचा उपक्रम

चिंचवड : – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम या अभियानांतर्गत रविवारी (दि. 6 रोजी) 2 ट्रक जलपर्णी काढण्यात आली. अभियानाचे 183 दिवस पूर्ण झाले असून आतापर्यंत 1275 ट्रक जलपर्णी नदीतून काढण्यात आली आहे. थेरगाव येथील सकाळी केजुबाई बंधारा बोट क्लब येथे हे अभियान पार पडले. या वेळी घाटावर संदिप वाल्हेकर व त्यांच्या एस. पी. वायर्स या कंपनत्तील 20 सहकार्‍यांनी श्रमदानात सहभाग घेतला. तसेच रोटरी क्लब ऑफ मालेगावचे डॉ. दिलिप भावसार हे अभियान समजावून घेऊन मालेगाव येथे चालू करण्यासाठी आले होते.

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच रानजाई प्रकल्पाचे 50मजूर, पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक रोटरी क्लबचे सदस्य, क्वीन्स टाऊन जेष्ठ नागरिक संघ, पर्यावरण संवर्धन समितीचे स्वयंसेवक, पीसीसीएफ, एसकेएफ, कामगार संघटना, पोलिस मित्र मंडळ, राधाबाई कुलकर्णी, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे आदी या अभियानासाठी उपस्थित होते. गेल्या 183 दिवसांत जलपर्णीमुक्त पवनामाईसाठी केलेले वेगवेगळे उपाय, प्रयत्न, उगम ते संगम पवित्र पवनामाई संकल्पना रोटरीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर आणि सोमनाथ आबा मुसुडगे यांनी विस्तृतपणे सर्व नवीन सहभागी सदस्यांना सांगितली. भविष्यात केल्या जाणार्‍या तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी कामाची, योजनांची माहिती दिली.

पुढील रविवारी (दि. 13 रोजी) केजुबाई बंधारा याच ठिकाणी क्विन्स टाऊन येथील लहान शिबिरार्थी पालकांसह या अभियानात सहभागी होणार आहेत. तसेच नदी प्रदूषण समजून घेऊन त्याच्यावरील उपाय योजना याबाबत मार्गदर्शऩ केले जाणार आहे.