कुणाल लांडगे फाउंडेशनच्यातर्फे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पवना नदीला जलपर्णीचा विळखा पडल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. महापालिकेला यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र जलपर्णी काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने कुणाल लांडगे स्पोर्टस् फाउंडेशनतर्फे रविवारी जलपर्णी मुक्त पवनामाई अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानास युवांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. या अभियानामध्ये ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, ह प्रभाग स्वीकृत सदस्य कुणाल लांडगे, सुनील लांडगे, विकास आबा लांडे, अप्पा धझावडे, संतोष टोनगे, गजानन मोरे, मयुर रानवडे, आकाश लांडगे, विशाल लांडगे, डॉ.भालशंकर, गणेश जवलकर, अमित लांडे, भाजपा पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, युवक, महापालिका अधिकारी यांनी या अभियानामध्ये सहभाग घेतला होता.
पालिका कर्मचारी सहभागी होणार
मागील स्थायी समितीमध्ये नद्यामधील जलपर्णी न काढल्याने शहराला डासांचा त्रास सहन करावा लागतो आहे, त्यामुळे जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने काम सुरु करावे अशा सूचना स्थायी सभापती आणि सदस्यांनी दिल्या होत्या. मात्र अद्यापपर्यंत या नदीमधील जलपर्णीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याशिवाय जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने निविदा राबविणार नसल्याचे सांगितले आहे. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी जलपर्णी काढतील, असे आयुक्तांनी सांगितले.
नागरिकांनी सहभागी व्हावे
मात्र परिसरातील नागरिकांना या जलपर्णीमुळे डासांचा त्रास सहन करावा लागत होता. तसेच विविध आजारांचा सामना करावा लागतो आहे. परिसरातील नागरिकांची डासांपासून मुक्तता कऱण्यासाठी कुणाल लांडगे स्पोर्टस् फाउंडेशनतर्फे जलपर्णी काढण्यासाठी अभियान राबण्यिात आले आहे. या अभियानाअंतर्गत दर रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी ही जलपर्णी काढण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे आणी जलपर्णी मुक्त पवनामाई करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन स्वीकृत सदस्य कुणाल लांडगे यांनी केले आहे.