जळगाव । ध्वजारोहण, मानवंदना आणि त्यानंतर पार पडलेल्या शानदार संचलनाने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 57 व्या वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्य हे प्रगतीचे अनेक नवे आयाम गाठत असून राज्य शासनाने राबवलेले जलयुक्त शिवार अभियान हे देशाला मार्गदर्शक ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी केले. जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ राज्याचे कृषि व फलोत्पादन, पणन आणि स्वच्छता व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील, आ. सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, नंदकुमार ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल भामरे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.आर. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक , राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
उत्कृष्ट कर्मचार्यांचा गौरव: पोलीस कवायत मैदान येथे सकाळी आठ वाजता ना. खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शानदार संचलन करण्यात आले. त्यात जिल्हा पोलीस दल, होमगार्ड, वाहतुक पोलीस, महिला पोलीस पथक, बॉम्ब शोधक पथक, अग्निशमन पथक, निर्भया पथकांनी संचलनात सहभाग घेतला. यावेळी ना. खोत यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना गौरविण्यात आले. उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देऊन ना. खोत म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानाची चांगली अंमलबजावणी झाल्याने शेतकर्यांच्या जीवनात परिवर्तन होत आहे. पिकांचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर वाढले आहे.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात ध्वजारोहण
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारातही महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इमारतीतील सर्व कार्यालयांचे प्रमुख तसेच सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते.
सन्मानार्थिंची नावे याप्रमाणे: जिल्हा युवा पुरस्कार- युवक- डॉ. श्रेयस घनश्याम महाजन, युवती- दिपमाला राजेंद्र वंजारी, संस्था- केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगाव अध्यक्ष भरत अमळकर यावेळी सन 2015-16 साठी राज्यस्तर पुरस्कार भरारी बहुउद्देशिय संस्था , अध्यक्ष दीपक परदेशी व जिल्हा युवा पुरस्कार यशोधन चॅरीटेबल ट्रस्ट, चोपडा अध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांनाही गौरविण्यात आले.
शेतकर्यांच्या सर्वांगिण विकासास प्राधान्य
शेतकर्यांचा सर्वांगिण विकास करण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी शेतीचे अद्यावत तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ हे अभियान शासनाने सुरु केले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकर्यांनी उत्पादित केलेली तूर खरेदीसाठी राज्य शासनाने 3 हजार कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली असून आतापर्यंत 50 लाख क्विंटल तूर खरेदी शासनाने केली आहे. खर्या अर्थाने सामान्य माणूस, कष्टकरी, कामगार आणि शेतकर्यांच्या हितासाठी काम करणारे हे शासन आहे. शासनाच्या विविध उपक्रमांना जनतेची साथ लाभत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.त्यानंतर ना. खोत यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना भेटून शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अनिल पाटील आणि प्रा. डॉ. गयाज उस्मानी यांनी केले.
पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह
पोलीस अधिकारी/कर्मचारी :- इश्वर जगन्नाथ सोनवणे, विजय श्रीकृष्ण बोत्रे, रविंद्र ब. सपकाळे, शेख मकसुद बशिर, मुजफरअली सैय्यद, राजेंद्र हं. पवार, तुकाराम निंबाळकर, सुनिल बा. पाटील, जयंत भा. चौधरी, दिलीप विठोबा पाटील, अरुण वामनाव पाटील, जयवंत सं. पाटील, दिनेशसिंग लोटू पाटील, प्रदीप रा. चिरमाडे, सुनिल शा. पाटील, नरेंद्र लो. पाटील, प्रदिप व. पाटील, जमील अ. हमीद खान, जिल्हा क्रिडा पुरस्कार – गुणवंत खेळाडू- सिध्दांत ईश्वर पाटील (तायक्वोंदो), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक- अनिल हरिचंद्र माकडे( आट्यापाट्या), गुणवंत क्रीडा संघटक- शेख फारुक अब्दुला( फुटबॉल, हॉकी) स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत सन्मानित करण्यात आलेल्या ग्रामपंचायती- पिंगळवाडे , ता.अमळनेर, पिंपळगाव बु. ता. भडगाव, टहाकळी, ता. भुसावळ, हरणखेडा, ता. बोदवड, चितेगाव, ता. चाळीसगाव, वढोदा, ता. चोपडा, धानोरा, ता. धरणगाव, गालापूर, ता. एरंडोल, फुफणी ता.जि. जळगाव, सामरोद, ता. जामनेर, सालबर्डी, ता. मुक्ताईनगर, सारोळा बु. ता. पाचोरा, बहादरपुर, ता. पारोळा, दसनुर, ता. रावेर, न्हावी प्रया, ता. यावल जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील तसेच सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते.
कर्मचार्यांच्या सकारात्मकतेतून बँक प्रगती करीत आहे
कर्मचारी हे प्रत्येक संस्थेचे आधारस्तंभ असतात. संचालक मंडळ, व्यवस्थापन व कर्मचारी यांच्या एकत्रित कार्य व निष्ठेतून संस्थेची प्रगती साकारली जात असते.कामगार दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेचा कर्मचार्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बँकेचे संचालक, व्यवस्थापकीय अधिकारी व कर्मचार्यांनी रेडक्रॉस सोसायटीच्या मदतीने रक्तदान केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी चेअरमन भालचंद्र पाटील होते. याप्रसंगी संचालक दुर्गादास नेवे, प्रा.विलास बोरोले, चंदन अत्तरदे, राजेश परमार, डॉ.सुहास महाजन, प्रबंध संचालक अनिल पाटकर, सहप्रबंध संचालक दिलीप देशमुख आदी उपस्थित होते.
कासा मोबीलायझेशन : 1ले बक्षिस प्रीती पोतदार, 2 रे बक्षिस कैलास वानखेडे, लोन मोबिलायझेशन- 1 ले बक्षिस राजेंद्र सोनार, 2 रे बक्षिस संजय राणे, एलआयसी प्रिमियम कलेक्शन योगेश महाजन, कॅश रिकव्हरी ऑफ एनपीए- 1ले बक्षिस रविंद्र मोरे, 2रे बक्षिस रविंद्र पाटील, अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात आलीत. बेस्ट डिपार्टमेंट- 1ले बक्षिस आयबीएफसी विभाग, 2 रे बक्षिस प्रॉपर्टी मेंटेनन्स विभाग, बेस्ट डिपार्टमेंट हेड- 1ले बक्षिस नयना बोंडे, 2 रे बक्षिस शिवकुमार शर्मा, बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द इयर: ऑफीसर- नीता वारुळकर, बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द इयर: प्युन – अनंत पाटील, रिमार्केबल परफॉर्मन्स : 1ले बक्षिस केतन कासलीवाल, 2रे बक्षिस दिपक खडसे यांना आणि सर्वात महत्वाचा पुरस्कार चेअरमन अॅवार्ड हा विनोद ओझा यांना देण्यात आला. याव्यतिरिक्त कर्मचार्यांसाठी बँकेतर्फे घेण्यात येणार्या प्रश्नमंजुषेचे 1 ले बक्षिस निलेश कुलकर्णी, 2रे बक्षिस उमेश अहिरराव, 3रे बक्षिस दिनेश येवले यांना देण्यात आले. सहप्रबंध संचालक दिलीप देशमुख यांनी प्रास्ताविक केले. संचालक डॉ.सुहास महाजन यांनी मनोगतात व्यक्त केले. सूत्रसंचालन बँकेच्या अधिकारी नीता वारुळकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता अर्चना चौधरी यांच्या वंदे मातरम गायनाने झाली.
कर्मचारी कौतुक सोहळयात मागील आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शाखा, विभाग, कर्मचार्यांस बक्षिस देवून सत्कार करण्यात आला. बेस्ट मेट शाखा- 1ले बक्षिस सिंहगड रोड शाखा; 2रे बक्षिस सांगवी शाखा, बेस्ट अर्बन शाखा- 1ले बक्षिस- गणेशवाडी शाखा; 2रे बक्षिस- भुसावळ शाखा, बेस्ट ग्रामीण शाखा -असोदा शाखा, बेस्ट कासा शाखा- पाचोरा शाखा, बेस्ट नवीन शाखा- बुलढाणा शाखा, बेस्ट मोबाईल अॅप व पीओएस मोबीलायझेशन शाखा-आकुर्डी शाखा, मॅनेजर ऑफ द इयर: मेट ो शाखा- संगीता जोशी- पिंप्री, मॅनेजर ऑफ द इयर: अर्बन शाखा-.मनोज जाधव- महाबळ, मॅनेजर ऑफ द इयर: रुरल शाखा- गुणवंत पाटील-भादली, मॅनेजर ऑफ द इयर: नवीन शाखा- एस. बी.गावीत- बुलढाणा, अशी शाखानिहाय बक्षिसे देण्यात आलीत.
उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कारांचे वितरण
सोमवरी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या 25 कर्मचार्यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून देवून गौरविण्यात आले. यात प्रभाग समिती क्र. 1 चे प्रभाग अधिकारी ए. ओ. सोनवणी, शहर अभियंता सुनिल भोळे आदींचा समावेश आहे. याप्रसंगी महापौर नितीन लढ्ढा, स्थायी सभापती वर्षा खडके, विरोधी पक्ष गटनेता सुनील माळी, नगरसेवक श्यामकांत सोनवणे, आयुक्त जीवन सोनवणे, उप आयुक्त लक्ष्मीकांत कहार आदी.
भंगाळे माध्यमिक विद्यालय
सिताबाई गणपत भंगाळे माध्यमिक विद्यालय व आप्पासाहेब जे. एस. शिंदे प्राथमिक विद्यामंदीरात महाराष्ट्र दिन व कामगार दिवसानिमित्त संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर विष्णु भंगाळे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी बाविस्कर मॅडम, गुलाबराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यशस्वीतेसाठी माध्यमिक मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रफुल्ल सरोदे, विजया चौधरी, दिपक भारंबे, विवेक नेहते, दिपनंदा पाटील, अनुपम कोल्हे, स्वाती पगारे, सचिन महाजन, निखिल नेहेते, सारिका सरोदे, विजय नारखेडे, प्रशांत भारंबे, भुषण भोळे, अश्निनी वाघ, दिपाली पाटील, उत्कर्षा सोनवणे, अनिता चित्ते आदींनी कामकाज पाहिले.
किरण पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
भगीरथ इंग्लिश स्कूलचे अष्टपैलू व गुणवंत शिक्षक किरण पाटील यांना पुणे येथील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. वडगाव शेरी येथील श्री साई प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र गुणवंत गौरव संमेलनात किरण पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार चित्रपट निर्माते, दिग्दर्शक रामदास फुटाणे, अभिनेते शशिकांत खानविलकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी, आमदार जगदिश मुळीक, मोनिका जोशी आदींच्या हस्ते किरण पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा जोशी, पर्यवेक्षक किशोर राजे, ज्येष्ठ कला शिक्षक एस. डी. भिरूड यांनी किरण पाटील यांचे अभिनंदन केले. किरण पाटील हे प्रयोगशिल शिक्षक म्हणून ओळखले जातात. ते विद्यार्थ्यांमध्ये आकलन क्षमता वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. यात इंग्रजीची भीती दूर करण्यासाठी वाचन कट्टा, प्रश्नोत्तराचे तास घेऊन विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी इंग्रजी विषयाची गोडी वाढविली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलेले आहे. यानंतर त्यांना सोमवारी देखील पुणे येथील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिवस साजरा करण्यात आला. पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष गफ्फार मलिक यांच्याहस्ते राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय. एस. महाजन, ज्ञानेश मोरे, अॅड. राजेश गोयर, सलिम इनामदार, अॅड. सचिन पाटील, श्री. महाडीक, अॅड. एस. एस. पाटील, काशिनाथ इंगळे, संदिप पवार, किशोर पाटील, शकील सर, असरा सर, राजू बाविस्कर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.