जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

0

चाळीसगाव/अडावद । महिला या घरकाम असो की नोकरी व्यवसाय प्रत्येक ठिकाणी आपले मन झोकून देऊन कुटुंबाची व समाजाची काळजी घेत असतात. मात्र सदैव धकाधकीत राहणार्‍या या आपल्या माता भगिनींना विविध आजार, अशक्तपणा, व्याधी या शरीरातील हिमोग्लोबिन च्या कमतरतेमुळे निर्माण होत असतात. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील 1 लक्ष महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करून त्यांची आजारापूर्वीच योग्य ती काळजी घेतली जावी. या उद्देशाने तालुक्याचे आमदार उन्मेश पाटील, पं.स.सभापती स्मितल बोरसे व उपसभापती संजय पाटील व आरोग्य विभागाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने अभियान राबविण्यात येत आहे. त्याची सुरुवात राज्याचे आरोग्यदूत म्हणून प्रसिद्ध असलेले जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरिष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील मेहूणबारे येथून 17 मे 2017 पासुन करण्यात करण्यात आली.

100 ते 150 ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी
अडावद । जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसा निमित्त अडावद प्रा.आ.केंद्रात जि.प. आरोग्य सभापती दिलीप पाटील यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन करून त्यात सुमारे 100-150 नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यात सरस्वती मातेची पूजा करून पाहुण्यांचे स्वागत डॉ. नीलिमा देशमुख व त्यांच्या सहकार्यातर्फे करण्यात आले. नुकतेच राष्ट्रपती पदक प्राप्त आरोग्य सेविका चंद्रकला चव्हाण यांचा दिलीप पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अडावदच्या सरपंच भारती सचिन महाजन हे होत्या. तर जी.प. सदस्या जोती पाटिल, पं.स.सदस्या अमीना तडवी, ताहेर मेंबर, दिनकर देशमुख, के.वी. देशमुख, चंद्रशेखर पाटिल, वजाहत काजी, कालू मिस्तरी, वसीम भाई, पिंटू सेट, शकील भाई, तुषार देशमुख, साखरलाल महाजन, हनुमंत महाजन, जिजाबराव देशमुख, जहांगीर मेम्बर, जावेद खान आदिसह असंख्य नागरिक उपसस्थित होते.

आरोग्य तपासणीला सहकार्याचे आवाहन
चाळीसगाव तालुक्यात टप्प्या टप्प्याने हिमोग्लोबिन तपासणी अभियान राबविण्यात येणार असून चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकाने आपल्या घरातील, शेजारी व गावातील महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करून या आरोग्ययज्ञात आपले सहकार्य द्यावे असे आवाहन पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे यांनी केले. कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे व उपसभापती संजय पाटील, पंचायत समिती सदस्य पाटील, पो.नि.श्री.शिरसाठ, आरोग्य अधिकारी डॉ.करंबेळकर, पं.स.चे विस्तार अधिकारी बागुल यांच्यासह मेहूणबारे परिसरातील शेकडो महिला भगिनी तपासणीसाठी उपस्थित होत्या.