जलसंपदामंत्र्यांनी नदीजोड प्रकल्पाच्या कामांचे श्रेय घेवू नये

0

आमदार किशोर पाटील यांनी जलसंपदामंत्री ना. महाजन यांचेवर सोडले टीकास्त्र

पाचोरा – बहुळा उतावळी नदीजोड करण्यात येईल अश्या स्वरुपाच्या बातम्या व फलक लावून राज्याचे जलसंपदा मंत्री पाचोरा मतदार संघातील मी मंजूर करून घेतलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या कामांचे श्रेय घेण्याचा उतावळीपणा करीत आहे. मंत्र्यांनी त्यांच्या मतदार संघातील पाण्याची मागणी करणार्या शेतकर्‍यांना आगोदर पाणी पाजावे अशी अनेक उदाहरणे व बहूळा -उतावळी नदीजोड कामांसाठी आतापर्यंत केलेल्या पाठपुराव्यांचे व मंजुरीचे कागदपत्रे पत्रकार परिषदेत दाखवून ना. महाजन यांचेवर टीकास्त्र सोडले. पाचोरा तालुक्यातील बहुळा -उतावळी नदीजोड प्रश्नावरून आमदार किशोर पाटील व राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांचेत श्रेय घेण्यावरून राजकारण तापले आहे. नदीजोड संदर्भात नुकतीच शहरात व बहुळा पुलावर भाजपतर्फे फलक लावण्यात आली आहेत. या विषयावर खुलासा देण्यासाठी आमदारांनी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती.

आमदारांनी प्रसार माध्यमांना मागील पुराव्यांसह माहिती देताना सांगितले की, 2007 च्या युती शासनाच्या कालावधीत माजी आमदार आर.ओ.पाटील असतांना व तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सिंघल असतांना जिल्ह्यात भडगांव – जुवार्डी- पथराड, व पाचोरा तालुक्यातील बहुळा – उतावळी नदीजोडची कामे होती. मात्र 2009 साली डी. लिमिटेशनमुळे लोहारा गट जामनेर तर भडगाव-पाचोरा मतदार संघाला जोडला गेला. झालेल्या निवडणुकात माजी आमदार आर.ओ.तात्यांचा पराभव झाला. त्यामुळे बहुळा- उतावळी नदीजोडचा विषय ना. महाजनांच्या मतदार संघाशी जोडला गेला. बहुळा उतावळी नदी जोडी सन 2009 ते 2018 पर्यंत गोराडखेडा ते लासगाव, बिल्दी, लासुरे, सांगवी – कुर्हाड, साजगाव – मोहाडी येथील शेतकरी 4 वर्षांपासून सतत मागणी करीत होते. तरीही ना. महाजन हे मतदार संघाच्या शेतकर्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत होते.

आमदार किशोर पाटील पुढे म्हणाले की, नुकतेच काही महिन्यांपूर्वी मी आमदार असतानाही शेतकर्यांनी मा.आ.आर. ओ. तात्यांच्या नेतृत्वात नदी जोडसाठी बहुळा पुलावर रास्तारोको आंदोलन केले होते. सन 2009 ते 2014 या कालावधीत पाचोर्‍याचे तत्कालीन आ. दिलीप वाघ व जामनेर चे आमदार गिरीष महाजन यांनी या विषयावर दुर्लक्ष केले. मात्र मी आमदार झाल्यापासून सातत्याने उतावळी बहुळेला जोडावी म्हणुन शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. या संदर्भात सिंचन विभागाकडून हे हेड बंद झाले होते. ते सुरू करायला लावुन वित्त विभागांतर्गत पैसा टाकून ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहीत झाल्या होत्या. त्यांच्या खात्यात चार महिन्यांपूर्वी रक्कमा टाकण्यात आल्या. तसेच जिल्हा नियोजनाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्री ना. पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना तश्या सुचना केल्या आहेत. बहुळा नदीजोडबाबत मागील 31 मार्च 2017 रोजी जलसंपदा मंत्री ना. महाजन यांना मागणीचे लेखी पत्र दिले होते. या सोबतच हडसन ते आसनखेडा पाटचार्याच्या कामांसाठी लागणारा 35 लाखांचा निधी देण्यात यावा, अशी ही मागणी केली होती. अश्या मागण्यांचे व विधान परिषदेत या संदर्भात आवाज उठविल्याचे पुरावे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सादर केली.

नेरीच्या शेतकर्यांना आगोदर पाणी पाजावे – आमदार पाटील
सतत 25 वर्षापासून आमदारकी भोगणार्‍या ना. महाजन यांना जर खरच श्रेय घ्यायचे असेल तर त्यांनी बहुळावरून जाणार्या 20 वर्षांपासून दुर्दशा झालेल्या पाटचार्‍यामुळे शेतकर्यांना थेंब भरही पाणी मिळाले नाही. त्या कँनाँलची कामे करावी. तसेच त्यांचाच मतदार संघातील पहुर, पाळधी व अंगावर रॉकेल टाकुन घेणार्या नेरीच्या शेतकर्यांना आगोदर पाणी पाजावे. अवर्षण – प्रवर्षणातील फक्त 35 लाखांचे अपुर्ण काम पूर्ण करून दाखवावे. मोहाडी धरणावरील 3 मोर्‍या पैकी 2 मोर्‍याकक मोर्‍या झाल्या मात्र एक मोरी पुर्ण होत नसल्याने या गावात एस. टी. देखील जात नाही ते काम पूर्ण करावे. गिरणा के.टी.वेअरचे खरे निर्माते स्व.आ.के.एम.बापू होते. त्यांनी 20एम.सी.एफ.टी. पाणी राखीव केले होते. मात्र ना. गिरीष महाजन यांनी ते आरक्षित पाणी देखील उडविले.

भाजपा पदाधिकार्‍यांनी देखील उतावळापणा करू नये
राज्यात सत्ता आली तर तापीचे पाणी जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगावला आणेल, पाणी आणले नाहीतर पुन्हा मते मागणार नाही असे निवडणूक पुर्वी म्हणाले होते त्याचे काय झाले. केंद्रीय सिंचन मंत्री म्हणतात की, राज्याचे जलसंपदामंत्री ना. महाजन कामे करीत नाही. असे अनेक गंभीर आरोप आ.पाटील यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी करुन बहुळा उतावळी नदीजोड ही कामे माझ्याच पाठपुराव्यातुन व मागणी वरून मंजूर झाली हे काम माझेच असून ना. महाजन व स्थानिक भाजपा पदाधिकार्‍यांनी श्रेय घेण्याचा उतावळीच्या कामाचा उतावळा पणा करू नये असे उपरोधिक टिका केल्या. यावेळी मा.आ.आर.ओ. पाटील, अँड दिनकर देवरे, नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, स्वीय सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.