जळगावच्या गोलाणी मार्केटजवळ हायप्रोफाईल कुंटनखान्यावर पोलिसांचा छापा : सहा तरुणींची सुटका तर तीन पुरूष ताब्यात
Police raid on high profile Kuntankhana in Jalgaon: Three men along with six young women are detained जळगाव : जळगावात अद्यापही कुंटणखाने सुरू असल्याची ओरड असतानाच पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गोलाणी मार्केटजवळील हायप्रोफाईल कुंटणखान्याचा पर्दाफाश करीत सहा तरुणींची सुटका केली आहे तर तीन पुरूषांना ताब्यात घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे मध्यवर्ती भागात गेल्या अनेक दिवसांपासून हा कुंटणखाना सुरू असल्यानेदेखील आश्चर्य व्यक्त होत आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
बुधवार, 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.30 च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे व पथकाने छापा टाकला. एका कंपनीच्या नावे असलेल्या खोलीत कुंटनखाना सुरू असताना पोलिस धडकल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी तीन पुरूषांसह सहा तरुणी, महिलांना ताब्यात घेतले.
कुंटनखान्याला आशीर्वाद कुणाचा ?
दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागात कुंटनखाना सुरू असताना अद्याप पोलिसांना त्याचा सुगावा कसा लागला नाही. कुंटनखान्यामागे कुणी राजकीय पदाधिकार्याचा हात तर नाही? अशी शंका उपस्थित होत आहे.