Ex-minister Sureshdada Jain granted regular bail in Jalgaon gharkul scam! जळगाव : राज्यभर चर्चिल्या गेलेल्या घरकुल घोटाळ्यात जळगावचे मामजी मंत्री सुरेशदादा जैन यांना बुधवारी मुंबई खंडपीठाने नियमित जामीन मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या निर्णयामुळे सुरेशदादा जैन यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अनेकांविरोधात दाखल आहे गुन्हा
राज्यातील बहुचर्चित घरकुल प्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह अनेक दिग्गज मंत्री, आमदार, नगरसेवक यांना ऑगस्ट 2018 महिन्याच्या अखेरीस धुळे जिल्हा न्यायालयाने शिक्षा आणि दंड ठोठावला होता. यानंतर बहुतांश संशयीतांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यातील काही अपवाद वगळता इतरांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तर दुसरीकडे माजी सुरेशदादा जैन यांना अनेक प्रयत्नानंतर 2019 मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव जैन यांना अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, गुरुवार दि.29 नोव्हेंबर रोजी सुरेशदादा जैन यांना मुंबई खंडपीठाने जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे जैन यांच्या निकटवर्तीयांनी वृत्ताला दुजोरा दिला असून अटी, शर्थी सायंकाळी कळणार असल्याचे कळते. जैन यांच्या निकटवर्तीयांनी वृत्ताला माध्यमांशी बोलतांना दुजोरा दिला आहे.