जळगावच्या तांबापूर्‍यात अल्पवयीन मुलाला लोखंडी रॉडने मारहाण

जळगाव : इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनवून टाकतो या कारणावरून तांबापूरा येथील टिपू सुलतान चौकात राहणार्‍या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला एकाने लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना शुक्रवार, 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री 11 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

वाईट वाटल्याने मारहाण
शाहदाब गफ्फार मणियार (16, रा.टिपू सुलतान चौक, तांबापुरा) हा मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शहादाब मणियार याला इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवून टाकण्याची सवय होती. याचे वाईट वाटल्याने समीर हनिफ काकर याने शुक्रवार, 11 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहादाब मणियार याच्या घरासमोर येवून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. शाहदाब हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. याबाबत शहादाब माणियार याच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी समीर हनीफ काकर याच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री 11 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अल्ताफ पठाण करीत आहे.