जळगाव : घर घेण्यासाठी माहेरुन तीन लाख रुपये न आणल्याने जळगाव शहरातील एमआयडीसी परीसरातील विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा
जळगाव शहरातील एमआयडीसी परीसरात दिव्या ज्ञानेश्वर मोहोटे (23) यांचा पुणे जिल्ह्यातील संगमनेर येथील ज्ञानेश्वर मधुकर मोहोटे यांच्या सोबत विवाह झाला आहे. सद्यस्थितीत दिव्या मोहोटे या आळंदीला राहतात. दिव्याने आळंदीचे घर घेण्यासाठी माहेरुन तीन लाख रुपये आणावेत या कारणावरून पती ज्ञानेश्वर मोहोटे व सासू अलका मोहोटे यांनी दिव्या हिस वेळोवेळी शिवीगाळ करत मारहाण केली व शारीरिक व मानसिक छळ केला. यास मामसासरे यांनीही प्रोत्साहन दिले. या प्रकरणी दिव्या हिने दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी ज्ञानेश्वर मोहोटे व सासु अलका मोहोटे व मामसासरे अरुण पंढरीनाथ फरगडे (तिन्ही रा. संगमनेर, जि.पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल संजय धनगर हे करीत आहेत.