जळगावच्या विवाहितेचा पाच लाखांसाठी छळ

जळगाव : शहरातील समर्थ कॉलनी येथील विवाहितेचा दुकानासाठी माहेरून पाच लाख रुपये न आणल्याने छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला.

भावालाही दिली धमकी
गायत्री भामरे (33) या कुटुंबियांसह वास्तव्या असून 12 ऑक्टोंबर 2018 ते 8 नोव्हेंबर 2021 या काळात गायत्री यांचा पती जितेंद्र अंबादास भामरे (39, रा.दशरथ नगर, जुना खेडी रोड, जळगाव) यांनी दुकानासाठी माहेरुन एक लाख रुपये आणावेत म्हणून शिवीगाळ करत शारीरीक व मानसिक छळ केला तसेच गायत्री यांच्या मुलीलाही शिवीगाळ करत, गायत्री यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी जितेंद्र भामरे यांनी दिली. छळाला कंटाळून गायत्री ह्या माहेरी निघून आल्या. या प्रकरणी गायत्री भामरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचे पती जितेंद्र अंबादास भामरे यांच्या विरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील करीत आहेत.