जळगावच्या सराफाकडील 21 लाखांचा ऐवज लांबवला : पोलिसासह दोघांविरोधात गुन्हा

20 lakhs looted from Sarafa in Jalgaon district : Accused Including Two Policemen जळगाव : जिल्ह्यातील शेंद्रा गावातील सराफा व्यावसायीकाला पोलिसाच्या मदतीने लुटण्यात आल्याची समोर आली असून पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केल्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिसांनी दोघांना अटक केली. रामचंद्र दत्तात्रय दहिवाळ (42, रा. साईबाबा मंदिरासमोर, हिरापूर) असे सराफाचे तर संतोष तेजराव वाघ (35, रा. महाल सोसायटी, फ्लॅट क्र.105, साई मंदिरासमोर, चिकलठाणा) असे संशयीत आरोपी पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे.

चेक देत असल्याने व्यवहार फिस्कटला
याप्रकरणी अशोक विसपुते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे जळगाव शहरामध्ये सराफाचे दुकान आहे. चार महिन्यापूर्वी त्यांचा दहिवाळ सोबत फोनवरून परिचय झाला होता. रामचंद्र दहिवाळ यांचे भवानी ज्वेलर्स नावाचे दुकान असून ते नेहमीच विसपुतेंच्या संपर्कात होते. 12 सप्टेंबर रोजी दहिवाळणे विसपुते यांना फोन लावून मला मालाची गरज असून तुमच्या डिझाईन दाखवा असे सांगितले. नगरमार्गे कारने (एमएच 19, डीव्ही 6336) चालक दिनेश वाव्हळसह औरंगाबादेत आले. व्यापारी विसपुते यांनी दहिवाळला दुकानातल्या दागिण्यांचे डिझाईन दाखवल्यानंतर मला या डिझाईन आवडल्या हे सोने मी ठेवून घेतो आणि तुम्हाला चेक देतो असं म्हणाला, मात्र विसपुते यांनी रोख पैसे मागविले. यामुळे व्यवहार फिस्कटला.

पोलिसानेच लुटला ऐवज
12 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास विसपुते केंब्रिज चौकात आल्यानंतर कारच्या मागून एक कार आली. त्यांनी थांबण्याचा इशारा केला. यावेळी कारमधून पोलीस संतोष वाघ उतरला. त्याने मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू आहे. दौरा म्हणजे काय कळतं का? तुम्ही कोण आहात असे म्हणत कारची तीन वेळा झडती घेतली. यावेळी मोबाईल बंद करण्यास सांगितले. त्यावर व्यापारी विसपुते यांना आधीच हृदयविकाराचा आजार असल्याने ते पुरते घाबरून गेले. कारमध्ये दागिने सापडल्यानंतर तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करतो. म्हणत आरोपी वाघ याने तिथून ऐवज व रोख रक्कम घेत काढता पाय घेतला.

तक्रार दाखल करताच फिरली तपासचक्रे
या प्रकारानंतर विसपुते यांची अचानक तब्येत बिघडली. तब्येत ठीक झाल्यानंतर विसपुते यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तपासचक्रे गतिमान करण्यात आल्यानंतर सराफासह त्या पोलिसाला अटक करण्यात आली. आरोपींना 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सोडवण्यात आली. पुढील तपास अर्जुन राऊत करीत आहेत.