जळगाव :- शहरातील हॉटेल व्यावसायीक अशोक बारकू महाजन उर्फ महाराज (46, रा.जाकीर हुसेन कॉलनी, जळगाव) यांचा अपघाती मृत्यू झाला.
रविवारी रात्री साडे आठ वाजता शिरसोली रस्त्यावरील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर हा अपघात झाला असून नेमका अपघात कसा झाला याबाबत माहिती कळू शकली नाही. महाजन यांची जैन व्हॅली कंपनीला लागूनच हॉटेल आहे.