जळगावला येण्यामागे माझा ‘हा’ स्वार्थ : सुप्रिया सुळेंनी सांगितले जळगावला येण्याचे कारण

0

जळगाव: राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आज शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होत आहे. शहरातील मु.जे.महाविद्यालय, बेंडाळे महिला महाविद्यालय येथे सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित कार्यक्रम झाले. बेंडाळे महाविद्यालयात बोलतांना सुप्रिया सुळे यांनी जळगावच्या भरीतचे कौतुक केले. जळगावला येण्यामागे माझा वैयक्तिक स्वार्थ असल्याचे त्यांनी सांगितले. जळगावचा भरीत खूप प्रसिद्ध असून बाहेरून कोणीही जळगावला आल्यावर भरीतचा आस्वाद घेतातातच. जळगावला येऊन भरीत खाल्ले नाही तर काय खाल्ले? अशीच परिस्थिती होते. मी पक्षाच्या कामासाठी किंवा इतर कामांसाठी जळगावला येते, मात्र कामासोबत मी जळगावचा भरीत खाण्यासाठी देखील येते. कामासाठी ५० टक्के आणि भरीत खाण्यासाठी ५० टक्के हा उद्देश जळगाव दौऱ्यामागे असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

जळगावच्या मातीत वेगळेपण असून याठिकाणी खूप काही शिकायला मिळते. जळगावला आल्यावर मला नवीन गोष्ट शिकायला मिळते अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी जळगावचे कौतुक केले. शैक्षणिकबाबींवर मुंबई, पुण्यासारख्या शहराची बरोबरी जळगाव शहर करत असल्याचे अभिमान असल्याचेही खासदार सुळे यांनी सांगितले. महिलांना रोजगार देण्यासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक उपक्रम राज्यात कोठेही नाही ते उपक्रम जळगाव शहरातील महाविद्यालयांमध्ये सुरु असल्याचे कौतुक आहे असेही त्यांनी सांगितले.