Jalgaon’s notorious criminal Rahul Barhate has been ‘placed’ for a year जळगाव : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या व गुन्हेगारी पार्श्वभूमीवर चर्चेत आलेल्या अट्टल गुन्हेगार राहुल रामचंद्र बर्हाटे (३३, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत जिल्हा पोलीस प्रशासनाने कारवाई केल्याने गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, संशयीताची जळगाव येथून नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
राहुल बर्हाटेविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल
जळगाव शहरातील एम.आय.डी.सी, जिल्हापेठ पोलीस स्टेशनला राहुल बर्हाटेविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मोठी दुखापत, गैर कायद्याची मंडळी जमवुन दंगल घडवणे, गृह अतिक्रमण, सरकारी नोकरावर हल्ला, जिवेठार मारण्याची धमकी देणे असे एकुण ९ गुन्हे दाखल असून काही वेळा प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. तसेच त्याला यापूर्वी मुं.पो.का.क. ५५ प्रमाणे दोन वर्षांसाठी हद्दपारही करण्यात आले होते. राहुल बर्हाटे याच्याविरुद्ध जळगाव शहरातील विविध पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, मोठी दुखापत, दंगल घडविणे, गृह अतिक्रमण, सरकारी नोकरावर हल्ला, व जिवे मारण्याची धमकी देणे अश्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून त्यास या गुन्हयांमध्ये वेळोवेळी अटक करण्यात आली होती. परंतू तो न्यायालयातून जामीनावर सुटताच पुन्हा भारतीय दंड विधान, व मुंबई पोलीस कायदा अंतर्गत गुन्हे करीत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनपी एमपीडीएची कारवाई केली.
राहुलपासून सर्वसामान्य लोकांच्या जिवीतास धोका
दिवसेिंदवस वेगवेगळ्या तर्हेने राहुलची गुन्हे करण्याची प्रवृत्ती बळावत चालली होती. संशयीतांविरोधात महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हात भट्टीवाले औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणार्या व्यक्ती (व्हीडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन १९८१ नुसार ‘धोकादायक व्यक्ती’ या संज्ञेत स्थानबद्धतेची कारवाई करणे आवश्यक असल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी चौकशी पूर्ण करीत २८ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याची पडताळणी केल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी जिल्हादंडाधिकारी जळगाव यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याबाबत गुरुवारी आदेश काढण्यात आले.