जळगाव : शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी सचिन गुरुदास पाटील (21, सम्राट कॉलनी, जळगाव) यास डोंबिवली येथून पीडीत मुलीसह ताब्यात घेण्यात आले. अल्पवयीन पीडीतेवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले असून त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला जळगाव न्यायालयात हजर केले असता न्या.सुवर्णा कुलकर्णी यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
अल्पवयीन मुलीसह संशयीत ताब्यात
शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलील 24 एप्रिल रोजी आरोपी सचिन पाटील याने पळवून नेले होते. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी डोंबिवली असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर 10 मे रोजी पहाटे आरोपीला अटक करण्यात आली. एमआयडीसी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे, एएसआय आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, विकास सातदिवे, किरण पाटील, सपना ऐगुंटल्ला आदींच्या पथकने ही कारवाई केली. दरम्यान, पीडीतेवर अत्याचार झाल्याने या गुन्ह्यात अत्याचार व शोषण हे कलम वाढवण्यात आले आहे.