नाशिक : जळगावचे दोन तरुण गोदावरी नदी पात्रात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गणेश सुरेश निकम (23) आणि योगेश दुसाने (24) अशी मयतांची नावे आहेत. आडगाव पोलिस स्टेशनला या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.
रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह गोदावरीत तरुणांना जलसमाधी
आडगाव येथून द्वारका सर्कलच्या दिशेने दुचाकीने दोघे तरुण येत होते. दरम्यान कन्नमवार पुलाजवळ पात्रानजीक दोघांनाही रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दुचाकीसह नदीत पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्र असल्यामुळे हा प्रकार कुणाला लवकर समजला नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी शोधकार्य राबवत दोघांचे शव बाहेर काढले.