जळगाव : शहरातील अयोध्यानगरातील तरुण व तरुणीला वेगवेगळया मोबाईल क्रमांकांवरुन फोन करून त्रास देणार्या तरुणांविरोधात सोमवार, 4 एप्रिल रोजी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
जीवाचे बरे वाईट करण्याचीही धमकी
अयोध्यानगरात हाजमी अहमद मेहंदी हे वास्तव्यास आहेत. सोमवारी त्यांच्या मुलगा आणि मुलीला संशयीत सत्यम साहू (जगवाणी नगर) या तरुणाने वेगवेगळ्या मोबाईल क्रमाकांवरुन फोन करीत शिवीगाळ केली तसेच तुम्हाला मारुन टाकेन, नाही तर माझ्या जीवाचे बरे वाईट करुन व तुमचे नाव पसरवेल अशी धमकी दिली. अशा आशयाच्या हाजमी मेहंदी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सत्यम साहू विरोधात सोमवारी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील हे करीत आहेत.