जळगाव । छत्रपती शिवरायांचे दर्शन तसेच रक्तदान करुन जळगावचे डी. जे. व्यावसायीक किशोर पाटील पत्नी संध्या लहान मुलगा वास्तव यांना घेवून टाटा नेक्सान गाडीद्वारे दिनांक 13 मे पासून जळगाव येथून भारत भ्रमणासाठी निघालेले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, तामिळनाडू,पांडेचरी, आंध्र, आदी राज्य पाहून झालेली आहेत. अतिशय गंमतीने व आनंदाने पाटील परीवार प्रवास करीत गुुरुवारी जगन्नाथपुरी येथे दाखल झाले आहे. असूनप्रवासातील निवडक चित्रफित ते फेसबुकवरुन लाईव्ह सादर करीत आहेत.
विविध संस्कृतीची ओळख
दृकश्राव्य माध्यमातून तामिळनाडूतील भात शेती, केरळचा समुद्र किनारा, विविध मंदीरे,रस्त्यावरील फणस विक्रेत्या महिलांशी झालेला संवाद, टाटाच्या शो रुममध्ये होत असणारे स्वागत आदी बाकी फेसबुकवर शेअर करीत आहेत. प्रत्येक ठिकाण तेथिल कल्चरआदी माहिती किशोर पाटील संध्या पाटील शेअर करीत आहेत. दरम्यान पाटील दाम्पत्याने 5 हजार किमी प्रवास पूर्ण केला आहे.
प्रवासात आपुलकीचे दर्शन
किशोर पाटील यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, भारत भ्रमणासाठी आम्ही आठ ते दहा दिवसापासून निघालेलो आहोत. ठिकठिकाणी आम्हाला लोक विचारणा करीत आहेत. प्रोत्साहीत करीत आहेत. प्रवासात काही त्रास झाला का असे आपुलकीने विचारणारे तरुण भेटले की अजुन बळ मिळत. वाटेत अनेक टोलनाके लागलेत पण अनेक ठिकाणी त्यांनी टोल स्विकारला नाही.
घरा बाहेर निघा
प्रत्येक परिवाराने आपल्या परीवारासह छोट्या छोट्या ट्रीप आयोजीत घरा बाहेर निघा..असा संदेश पाटील दाम्पत्य फेसबुकच्या माध्यमातून देत आहेत. आज पर्यंतच्या प्रवासात पाटील दाम्पत्याला होंडा कट्टा मित्र मंडळ, मॉनिंग मित्र मंडळ, फेसबुकवरील कुबेर समूह यांच फार मोठ सहकार्य लाभल्याचे
सांगतांना विसरत नाहीत.