जळगावातील प्रौढाचा भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेने मृत्यू : जळगावातील घटना

जळगाव : कामावरून घरी परतणार्‍या 54 वर्षीय प्रौढाला भरधाव ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिल्याने प्रौढाचा मृत्यू झाला. या करणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विनय रामचंद्र खडके (54, रा.सोपानदेव नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालक विजय फत्रू सुरळकर (25, सामरोद, ता.जामनेर) यास ट्रॅव्हल्ससह ताब्यात घेण्यात आले आहे.

ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वार
विनय खडके हे पारोळा रुग्णालयात लॅब असिस्टंट म्हणून नोकरीला असल्याने ते दररोज दुचाकी (एम.एच.19 यु.7303) अप-डाऊन करीत होते. मंगळवारी नेहमीप्रमाणे दुपारी चार वाजेच्या सुमारास ड्यूटी संपल्यानंतर पारोळा येथून ते घरी येत असतांना अजिंठा चौकात रोटरी सर्कलजवळ नेरी नाक्याकडून जामनेर जाणार्‍या बेदमुथा ट्रॅव्हल्सने त्यांना धडक दिल्याने ते रस्त्यावर फेकले केले. त्यात त्यांच्या डोक्याला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली. घटना घडल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. उपचार सुरू असताना सहा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या पत्नी व नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी रोहिणी, मुलगा अतीष असा परीवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.