जळगावातील फुकटपुरा परिसरात अग्नितांडव

0
सुमारे २० घरे आगिच्या भक्ष्यस्थानी; मोठ्या प्रमाणावर नुकसान
जळगाव- शहरातील इच्छादेवी चौकाच्या पाठीमागे असलेल्या फुकटपुरा परिसरात भीषण आग लागून सुमारे २० घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास लागलेही ही आग सुमारे तासाभराने आटोक्यात आली. वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. महामार्गावर वाहतूक ठप्प होती. रावेळी पोलीसांनी वेळीच धाव घेतल्राने मदत कार्रास सुरूवात केली होती तर परीसरातील नागरीकांना सर्व गॅसेचे सिलेंडर हे जवळ असलेल्रा नाल्रात फेकले.
……………………………..
चार बंबांनी विझविली आग
शहरातील इच्छादेवी चौक परिसरात फुकटपुरा भाग आहे. या भागात राहणारे गौतम सुरवाडे यांच्या पत्नी उज्वला सुरवाडे या त्यांच्या मुलांसोबत बाहेर बसलेल्या होत्या. त्यांच्या घराच्या मागच्या बाजूने धूर निघत असल्याचे शेजार्‍यांनी त्यांना सांगितले. आगिमुळे एका सिलेंडरचा स्फोट झाला. आगिने क्षणात रौद्ररूप धारण केले. पार्टीशनची घरे असल्याने क्षणात सुमारे वीस घरांना आग लागल्राने वीसच्रा विस घरे या आगीच्या भक्ष्यस्थानी आली. आगीचे रौद्ररूप बघून रहिवाशांनी तत्काळ गॅस सिलेंडर नाल्यात फेकले. जैन इरिगेशनसह महानगरपालिकेचे तीन अशा ४ बंबानी तासभर शर्थीचे प्रयत्न करीत ही आग आटोक्यात आणली. परिसरातील रहिवाशांनीही मदत कार्य केले. मोठ्या प्रमाणवर नुकसान झाले असून संसार जळून खाक झाल्याने रहिवाशांनी मोठा आक्रोश केला. पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, अपर पोलीस अधीक्षक श्री मातानी, डीवायएसपी सचिन सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुर्‍हाडे, एमआयडीसी पोलीस निरीक्षक अनिरूद्ध आढाव यांच्यासह क्रूआरटी पथक, एमआयडीसी, शहर, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे या भागात काळोखात मदतकार्य रात्री उशीरापर्यंत सुरूच होते. महामार्गावर बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. आगीचे कारण रात्री उशीरापर्यंत समजू शकले नाही.