जळगावातील विवाहितेचा छळ : पतीसह सासुविरोधात गुन्हा

जळगाव : लग्नात हुंडा कमी दिला म्हणून पतीकडून मारहाण करून जळगावातील दादावाडीतील 28 वषीृय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी शनिवार, 5 मार्च रोजी पतीसह सासूवर जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीसह सासुविरोधात गुन्हा
जळगावच्या दादावाडीतील रहिवासी असलेल्या सपना गोपाल मराठे (28) यांचा विवाह चाळीसगाव तालुक्यातील नाव्हे येथील गोपाल तुकाराम मराठे यांच्याशी 5 मार्च 2017 रोजी रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाच्या 1 महिन्यानंतर पती गोपाल मराठे याने लग्नात हुंडा कमी दिला व माझ्यासह माझ्या नातेवाईकांना पाहिजे असा मानपान न दिल्याने विवाहितेला टोमणे मारत मारहाण सुरू केली तर सासूने देखील गांजपाठ केला. या त्रासाला कंटाळून विवाहिता सपना मराठे या जळगावातील दादावाडी येथे माहेरी निघून आल्या. या संदर्भात शनिवार, 5 मार्च रोजी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात पती गोपाल तुकाराम मराठे, सासु सुंदराबाई तुकाराम मराठे (दोन्ही रा.नाव्हे, चाळीसगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाण पुढील तपास पोलिस नाईक विश्वनाथ गायकवाड करीत आहे.