जळगावातील शासकीय ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात

0

बीएसएनएल कार्यालयात कंत्राटी पध्दतीने कामावर लावण्यासाठी स्वीकारली 25 हजारांची लाच

जळगाव : रावेर बीएसएनएल कार्यालयात कंत्राटी पध्दतीने कामावर लावण्यासाठी 25 हजारांची लाच मागणार्‍या जळगावातील शासकीय कंत्राटदारास जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी लाच घेताना रंगेहाथ अटक केल्याने खळबळ उडाली आहे. सुभाष कोंडाजीराव पवार (फ्लॅट नं.15, गणपती रेसीडेंसी, गणपती नगर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जळगावातील आर.आर.हायस्कूलनजीक असलेल्या ओंकार कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयातून आरोपीला अटक करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील 33 वर्षीय तक्रारदाराकडे आरोपीने 9 रोजी लाच मागितल्यानंतर त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदवली होती.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर, निरीक्षक निलेश लोधी व संजोग बच्छाव, एएसआय रवींद्र माळी, हवादार अशोक अहीरे, हवालदार सुरेश पाटील, हवालदार सुनील पाटील, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक जनार्दन चौधरी, कॉन्स्टेबल प्रशांत ठाकुर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने यशस्वी केला.