A young man died of shock in Vitthal Colony in Jalgaon जळगाव : इलेक्ट्रिकचे काम करीत असताना शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू ओढवला. ही घटना गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास शहरातील हरीविठ्ठल नगरात घडली. अक्षय प्रल्हाद साठे (24, रा. हरीविठ्ठल नगर) असे मयत युवकाचे नाव आहे.
इलेक्ट्रीक काम करताना बसला जोरदार झटक
सिंधी कॉलनी परीसरात बांधकामाच्या ठिकाणी ईलेक्ट्रीक करण्याचे काम अक्षयने घेतल्याने गुरुवारी सायंकाळी काम करीत असताना त्याला विजेचा जोरदार शॉक बसल्याने तो खाली पडला. त्याच्या सहकार्यांनी त्यास जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात तातडीने दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी अक्षय साठे याला मयत घोषित केले.
कुटुंबियांचा टाहो
याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, बहिण असा परीवार आहे. तरुणाचा मृतदेह पाहताच कुटुंबियांनी टाहो फोडला.