जळगावातील 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेत संपवले जीवन

A 20-year-old married woman from Jalgaon ended her life by hanging Herself जळगाव : एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील 20 वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना रामेश्वर कॉलनीत सोमवारी सायंकाळी घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. काजल गणेश राठोड (20, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
काजल राठोड या आपल्या परीवारासह आपल्या रामेश्वर कॉलनी वास्तव्याला होत्या. सोमवारी 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास काजल राठोड यांनी राहत्या घरात कुणी नसतांना गळफास घेतला. आत्महत्या करण्याचे स्पष् कारण अद्याप समोर आलेले नाही.

एमआयडीसी पोलिसात नोंद
हा प्रकार कुटुंबियाला समजल्यानंतर त्यांनी तातडीने काजल यांना खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल सोनवणे यांनी मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल स्वप्नील पाटील करीत आहे.