जळगावातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव : शहरातील ईश्वर कॉलनीतून मध्यरात्री एकाची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. याबाबत रविवार, 5 जून रोजी रात्री एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.

घराबाहेरून लांबवली दुचाकी
ओमप्रकाश हेमलाल प्रजापती (48, ईश्वर कॉलनी, जुना मेहरूण रोड, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून त्यांच्याकडे दुचाकी (एम.एच.19 टी. 3322) असून 14 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास त्यांनपी दुचाकी घराच्या कंम्पाऊंडमध्ये पार्क केली मात्र मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी 20 हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 15 मे रोजी सकाळी आठ वाजता उघडकीला आली. रविवार, 5 जून रोजी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार मिलिंद सोनवणे करीत आहे.