जळगाव : शहरातील रींगरोड परीसरातून हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात सातत्याने दुचाकी चोरींचे सत्र सुरू झाल्याने जळगाव गुन्हे शाखेसह पोलिस यंत्रणेने दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या बांधण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल
भरत राजू गवळी (23, रा.शनीपेठ, जळगाव) हा तरुण हातमजूरीचे काम करतो. त्याच्याकडे दुचाकी (क्रांक एम.एच.19 सी.एस.3954) असून बुधवार, 1 डिसेंबर रोजी भरत गवळी हा दुचाकी घेवून शहरातील रिंगरोडवर असलेल्या यशोदाई मल्टिपर्पज हॉलजवळ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने आला होता. दुचाकी हॉल जवळ पार्किंगला लावली असता अज्ञात चोरट्यांनी ती लांबवली. परीसरात शोधाशोध केली दुचाकी मिळून न आल्याने अखेर शनिवार, 4 डिसेंबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोल्लिस नाईक भरत चव्हाण करीत आहे.