जळगाव : शनीपेठ पोलिसांनी दुचाकी चोरट्यांच्या शनिवारी मुसक्या आवळल्या असून आरोपींच्या ताब्यातून शनीपेठ परीसरातील रीधुरवाडा भागातून लांबवलेली दुचाकी जप्त करण्यात आली. महेश राजेंद्र तायडे (22) आणि दीपक लहानू कोळी (20, रा.वाल्मिक नगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी दाखल होता गुन्हा
दिवाकर हरीपद सांखी (41, रा.मातोश्री बिल्डींग रीधूरवाडा, शनीपेठ, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार, दि.20 जुलै रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांच्या मालकीची मोटारसायकल (एम.एच.19 ए.एच.7000) ही घरासमोर पार्किंग करून लावल्यानंतर ती चोरीला गेली होती. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करत असतांना मोटारसायकल चोरणारे चोरटे हे वाल्मिक नगरात असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर शनिवारी दुपारी तीन वाजता संशयीत आरोपींना अटक करण्यात आली.