जळगाव– काही दिवसांपूर्वी शहरातीलच एकजण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच बुधवारी आणखी एक कोरोना संशयित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे . याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे . जळगाव जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन झाली आहे.
जिल्हावासियांनो गांभीर्य लक्षात घेऊन लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करा असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.