जळगाव : शहरातील दालफड, शनीपेठ भागातील रहिवासी इसमाच्या घराबाहेर उभ्या असलेल्या चारचाकीवर अज्ञाताने दगड मारल्याने मागील बाजूची काच फुटल्याचा प्रकार शनिवार, 12 रोजी घडला. या प्रकरणी शनीपेठ पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
तक्रारदार नारायण रामनिवास तिवारी (दालफड, शनीपेठ) यांच्याकडे महिंद्रा कंपनीची चारचाकी केयुव्ही शंभर (एम.एच.19 सी.एफ.7978) असून ती घराबाहेर उभी असताना शनिवारी मध्यरात्री 12 वाजेनंतर व सकाळी आठ वाजेदरम्यान काहीतरी खोडकर वृत्तीने अज्ञाताने चारचाकीची मागील बाजूची काच फोडून नुकसान केले. या प्रकरणी शनीपेठ पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.