जळगावात आजपासून सर्वपक्षीय जनता कर्फ्यूचे आवाहन

0

जळगाव– शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या तब्बल २०९ इतकि झाली आहे. दिवसेंदिवस हि संख्या वाढतच आहे. हि बाब लक्षात घेऊन भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांनी उद्या दिनांक १४ ते १७ मे या कालावधीत जळगाव शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यासह जळगाव शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ हि चिंताजनक बाब आहे. कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होउ नये यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यथाशक्ती प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना साथ देण्यासाठी जळगाव शहरातील प्रमुख असलेले राजकीय पक्ष भाजप, राष्ट्रवादि, कॉंग्रेस यांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनाची हि साखळी तोडण्यासाठी उद्या दि. १४ ते १७ मे या कालावधीत जनता कर्फ्यूचे सर्वपक्षीय आवाहन करण्यात आले आहे. तरी जळगाव शहरातील नागरिकांनी कोरोनाची हि साखळी तोडण्यासाठी उद्या दि १४ ते १७ मे या कालावधीत जनता कर्फ्यूचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन राष्ट्रवादिचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केले आहे.