जळगाव : शहरातील खोटेनगर स्टॉपजवळ कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. या प्रकरणी जळगाव तालुका पोललसात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
कार चालकाविरोधात गुन्हा
शहरातील पिंप्राळा परीसरातील आरएल कॉलनी येथे अनिल युवराज पाटील (46) हे वास्तव्यास आहेत. शुक्रवार, 11 फेब्रुवारी रोजी अनिल पाटील हे त्यांच्या दुचाकीने खोटेनगर स्टाफ परीसरातून जात असताना चारचाकी (एम.एच.30 ए.एफ.5504) ने अनिल पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ते जखमी झाले व त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत अनिल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवार, 13 फेब्रुवारी रोजी कार चालकाविरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक दिनेश पाटील हे करीत आहेत.