जळगावात गावठी कट्ट्यासह संशयीत जाळ्यात

जळगाव : जळगावात कट्ट्याच्या धाकावर दहशत करणार्‍या खंडेराव नगरातील तरुणाला अटक जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. संशयीताच्या ताब्यातून 30 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. अश्विन विजय हिरे (20, खंडेराव नगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संशयीताला पुढील तपासकामी त्याला रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुधाकर अंभोरे, महेश महाजन, विजय पाटील, प्रीतम पाटील, सचिन महाजन, पंकज शिंदे आदींच्या पथकाने केली.