जळगावात चोरट्यांनी दुचाकी लांबविली

जळगाव : जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकात असलेल्या डॉमिनोज पिझ्झा येथील शाखा व्यवस्थापकाची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. ही घटना 29 ते 30 नोव्हेंबरदरम्यान घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात शुक्रवारी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
अर्जुन गोपाल अग्रवाल (26, रा.शनी मंदिर परीसर, कांचननगर, जळगाव) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अर्जुन अग्रवाल हे स्वातंत्र्य चौकातील डॉमिनोज पिझ्झा येथे व्यवस्थापक म्हणून काम करतात. 29 नोव्हेंबर रोजी रात्री 11 ते 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 3 वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी (एम.एच.19 ए.वाय.608) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी अर्जून अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून शुक्रवार, 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस नाईक युनुस तडवी करीत आहेत.