जळगावात चोरट्यांनी बंद घर फोडले

जळगाव : शहरातील वाघ नगराजवळील जिजाऊ नगर परीसरात मध्यरात्री चोरट्यांनी बंद घर फोडल्याची घटना शुक्रवार, 7 जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आली मात्र सुदैवाने चोरीत कोणताही मुद्देमाल चोरीस गेलेला नाही. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घराला केले टार्गेट
सतीश नाना बाविस्कर (35, रा.जिजाऊ नगर, वाघ नगर परीसर, जळगाव) हे पत्नी अनिता व दोन मुलांसह वास्तव्याला असून ते एमआयडीसीतील खाजगी कंपनीत नोकरीला आहे. गुरूवार, 6 जानेवारी रोजी सतीश बाविस्कर यांची रात्र पाळीसाठी कामावर होते तर त्यांची पत्नी अनिता या मुलगा अक्षय आणि मुलगी प्रज्ञा यांच्यासह त्यांच्या भावाकडे गेल्यानंतर घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. शुक्रवार, 7 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्या मुलांसह घरी आल्या असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांना घरात काहीही मुद्देमाल आढळून न आल्याने खाली हात परतावे लागले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसांना माहिती देण्यात आली. तालुका पोलिसांनी घटनेची माहिती घेवून पंचनामा केला आहे. याप्रकरणी सतीश बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.