जळगावात जागेच्या वादातून दोन महिलांचा विनयभंग
परस्परविरोधात जळगाव तालुका पोलिसात तीन जणांवर गुन्हा दाखल
जळगाव : शहरातील एका भागात जागेच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली तर दोन्ही कुटुंबातील दोन महिलांचा विनयभंग करण्यात आला. बुधवार, 16 फेब्रुवारी रोजी दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधात तीन जणांवर विनयभंग केल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जागेच्या वादातून हाणामारी व शिविगाळ
पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जळगाव शहरातील एका भागात दोन कुटुंबीय एकाच भागात राहतात. रविवार, 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जागेच्या वादातून दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे. दोन कुटुंबियांमध्ये झालेल्या वादात दोन महिलांचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला. एक-मेकांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोन्ही कुटुंबियांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात बुधवार, 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता धाव घेवून एकमेकांविरूध्द तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून परस्पर विरोधात तीन जणांविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार हरीलाल पाटील करीत आहे.