जळगाव : जुन्या भांडणाच्या कारणावरून कांचन नगरात प्रजापत नगरातील तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी बुधवार, 23 फेब्रुवारी रोजी शनीपेठ पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाविरोधात गुन्हा दाखल
शहरातील प्रजापत नगरातील रहिवासी राजेश रमेश गवळी (34) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्या असून बुधवार, 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राजेश गवळी हा कांचन नगरातील चौघुले प्लॉट येथे किराणा दुकानावर उभा असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून विशाल उर्फ पप्या (पूर्ण नाव माहित नाही) याने धारदार चाकूने वार करून जखमी केले. राजेशच्या मांडीला, कंबरेखाली वार करण्यात आले. जखमीस तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यासंदर्भात रात्री 10 वाजता संशयीत आरोपी विशाल उर्फ पप्या याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार प्रमोद पाटील करीत आहे.