जळगावात जैन भगवती दिक्षा समारंभ उत्साहात

0

जळगाव : भगवती दिक्षा समारंभाचे आयोजन शहरातील रतनलाल सी.बाफना स्वाध्याय भवनात करण्यात आले होते. यावेळी शहरातील कॉग्रेस भवन येथील जैन मंदीरापासून वरघोडा मिरवणूक सकाळी 7 वाजेपासून काढून आर सी बाफनाच्या यांच्या स्वाध्याय भवनाजवळ समारोप करण्यात आले. आयोजित कलेल्या भगवती दिक्षा समारंभात मयूर प्रविण चोपडा यांनी विधीवत दिक्षा ग्रहण केली.

स्वाध्यायभवनात दिक्षाग्रहण
दिक्षार्थी मयूर चोपडा हा तपस्वीराज कानमुनीजी म.सा., प्रवर्तक जिनेंद्र म.सा. यांच्या सान्निध्यात गेल्या 6 वर्षापासून होता. त्यामुळे त्यांच्यासोबत राहून मुनीचे जिवन कसे असते यांचे पुर्णपणे अनुभव घेत मयूरने दिक्षा घेण्याचा निर्णय घेतला. यांच्या निर्णयास घराच्यांनी पुर्णपणे पाठिंबा देत मान्यता दिली. आज तपस्वीराज कानमुनीजी म.सा., प्रवर्तक जिनेंद्र म.सा. यांच्या उपस्थितीत आर.सी. बाफणा स्वाध्याय भावनात दिक्षा ग्रहण केली. दिक्षा घेतल्यानंतर मयूर चोपडा यांचे नाव परीवर्तन करून भुषणमुनी असे ठेवण्यात आले. सर्वश्री दिक्षा समारंभाचे आयोजन रतनलाल सी बाफना यांच्यातर्फे करण्यात आले होते.

अशी निघाली मिरवणूक
काँग्रेस भावनाजवळील जैन मंदीराचे दर्शन घेवून शहरातून वरघोडा मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक काँग्रेस भवनापासून सुरू होवून ती चित्रा चौक, महावीर ज्वेलर्स, गणपती मंदीर, शिवाजी पुताळा, नविन बसस्थानक, स्वातंत्र्य चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, आकाशवाणी चौकमार्गे स्वाध्याय भवन पर्यंत काढण्यात आली होती. यावेळी रतनलाल सी बाफना, दलूभाऊ जैन, कुस्तूरचंद बाफना, कांतीलाल कोठारी, शंकरलाल कांकरीया, प्रविण पगारिया, प्रदिप मुथा, प्रविण छाजेड यांच्यासह आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी निघालेल्या वरघोडा मिरवणुकीदरम्यान समाजबांधवांनी ठिकठिकाणी पाण्याचे पाऊच व इतर थंडपेया उपलब्ध करुन दिले होता. त्यामुळे मिरवणूकीमध्ये कोणालाही कोणतीही अडचण निर्माण न होता. मिरवणूक शांततेत निघाली यावेळी समारंभाचे सर्व आयोजन आर.सी. बाफणा यांच्याकडून करण्यात आले होते.