जळगावात डंपरच्या धडकेत माजी सैनिकाचा मृत्यू

0

जळगाव- भरधाव वेगात येणार्‍या डंपरने धडक दिल्याने दुचाकीस्वार माजी सैनिकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जळगावातील अजिंठा चौफुलीवरील लढ्ढा फॉर्मजवळ दुपारी १.१५ च्या सुमारास घडली. सुरेश मराठे (वय ४५, रा. रामनंद नगर) असे मृताचे नाव असून ते जळगावात एसटी वर्कशॉपला कार्यरत होते.

आज सुटी असल्याने सुरेश मराठे हे मटन घेऊन त्यांची दुचाकी एमएच १८ एक्स ३३६२ वरून घरी जात होते. लढ्ढा फॉर्मजवळ ते रस्त्यावर येत असताना भुसावळकडून भरधाव वेगात येणार्‍या डंपर एमएच १२  सीटी ८२७१  ने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. यात ते खाली फेकले गेले व डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. डंपर चालक या घटनेनंतर पसार झाला.