जळगाव : खुनाच्या गुन्ह्यात साक्ष दिल्याच्या रागातून राजीव गांधी नगरातील दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रमेश बाबासाहेब झेंडे (46, रा.राजीव गांधी नगर, जळगाव) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
शिविगाळ करून केली मारहाण
रमेश झेंडे हे भिक्षुक असून आपल्या पत्नी संगीता यांच्यासह वास्तव्याला आहे. रमेश झेंडे यांनी एका खुनाच्या गुन्ह्यात साक्ष दिल्याच्या कारणावरून मंगळवार, 4 जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घरी असतांना संशयीत हग्गु जीवन जुन्नी, सागर जीवन जुन्नी आणि बळी जीवन जुन्नी (तिघे रा. राजीव गांधी नगर) यांनी रमेश झेंडी व त्यांची पत्नी संगीता यांना शिवीगाळ व मारहाण केली. यातील एकान रमेश झेंडे यांना दगडाने डोक्यावर व पाठीवर मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बुधवार, 5 जानेवारी रात्री रामानंदनगर पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.