जळगाव : शहरातील जगवाणी नगरातच्या कमानीजवळ दोन दुचाकींच्या धडकेत महिला जखमी झाली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जानेवारी महिन्यात झाला अपघात
एमआयडीसीतील जगवानी नगर कमानीजवळून रोहिणी अतुल ठाकरे (24, जयभवानी नगर, एमआयडीसी) या त्यांच्या दुचाकी (एम.एच.19 डी.एक्स.1303) ने सोमवार, 31 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घरी जात असतांना समोरून येणार्या दुचाकी (एम.एच.19 झेड.2331) ने जोरदार धडक दिली. यात धडकेत रोहिणी ठाकरे या जखमी झाल्या. त्यांना जळगाव शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. 15 दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी सोमवार, 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलिसात अपघाताला कारणीभूत ठरणार्या दुचाकी (एम.एच.19 झेड. 2331) च्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस नाईक अतुल पाटील करीत आहेत.