जळगाव : सायकलवरील जाणार्या व्यक्तीच्या हातातून चचार हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव शहरातील बसस्थानकाच्या मागील गल्लीत ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली.
धूम स्टाईलने मोबाईल लंपास
हंसराज बिहारीलाल पांडे (45, रा. महाजन नगर, मेहरूण, जळगाव) हे त्यांच्या समाजातील संस्थेच्या सभेच्या पत्रिका वाटपाचे काम आटोपून गुरुवार, 3 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता शहरातील जुने बसस्थानकाच्या मागे असलेल्या गल्लीतून सायकलीवरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तिघा भामट्यांनी त्यांच्या खिशातील चार हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरीने हिसकावून पळ काढला. याबाबत त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चंदेलकर करीत आहे.