जळगाव : एमआयडीसीतील एका कंपनीच्या बाहेर ट्रकमधून गार्डन पाईपची चोरी करतांना एकाला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दगडू सुकलाल पवार (35, रा.मच्छीबाजार, सुप्रिम कॉलनी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
बलवीरसिंग जयश्रीराम यादव (38, बगीयापूर, जि.भिंड, मध्यप्रदेश, ह.मु. लक्ष्मी पाईप, एमआयडीसी, जळगाव) हा तरुण नोकरीला आहे. शनिवार, 28 मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास संशयीत दगडू सुकलाल पवार (35, रा.मच्छीबाजार, सुप्रिम कॉलनी) हा आयशर क्रमांक (एम.एच.19 सी.डब्ल्यू.5238) मधून गार्डन पाईप चोरत असताना बलवीरसिंग यादव याच्या लक्षात ही बाब येताच त्यास पकडण्यात आले. यादव यांनी रविवार, 29 मे रोजी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी दगडू सुकलाल पवार याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार जितेंद्र राजपूत करीत आहे.