जळगाव : कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावरील पार्कींगमधून दुचाकी चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात दुचाकी चोरींचे सत्र सुरू असताना चोरटे गवसत नसल्याने दुचाकी चालकांमध्ये भीती पसरली आहे.
दुचाकी चोरट्यांचा उच्छाद कायम
शहरातील सिंधी कॉलनीतील कंवरनगरातील हरीष रामदास वालेचा (35) हा तरुण त्याच्या दुचाकी (एम.एच.19 डी.एफ.8998) ने आला असता त्याने दुचाकी कॉम्प्लेक्समधील तळ मजल्यावरील पार्कींगमध्ये लावली मात्र संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबविली. वालेचा यांनी बुधवारी शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास योगेश बोरसे हे करीत आहे.