जळगावात बस चालकाचा हात स्टेअरींग वळवताना मोडला

जळगाव : बस वळवताना चालकाचा हा स्टेअरींगमध्ये अडकल्याने मोडल्याची घटना रविवारी दुपारी जळगावात घडली. नांदुरी-मुक्ताईनगर बसचे चालक पंकज पाटील हे रविवारी दुपारी 1.30 वाजता नांदुरी-मुक्ताईनगर बस (क्रमांक 3917) घेवून जळगाव स्थानकात आले. त्यानंतर गाडी चालकाने बस आगारातून काढत असताना गाडीचे फूल स्टेअरींग फिरवले त्यानंतर तेवढ्याच जोराने फिरवलेल्या या स्टेअरिंगमध्ये चालक पंकज यांचा हात अडकल्याने तो फ्रॅक्चर झाला. त्यांना लगेच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचार करण्यात आले.