जळगाव:- भरधाव वेगाने जाणारा ट्रक दोन रिक्षांवर धडकून झालेल्या अपघातात सूनसगाव जिल्हा परिषद शाळेच्या सीमा नितीन कोष्टी या शिक्षिका ठार झाल्या तर एका शालेय विद्यार्थ्यासह पाच जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जळगावात महामार्गावर घडला.
शहरातील अजिंठा चौफुलीकडून इच्छादेवी मंदिराकडे जाणाऱ्या ट्रकच्या चालकास अचानक भोवळ आल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व तो समोरील दोन रिक्षांवर धडकला. यामधील जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यातील सीमा कोष्टी या शिक्षिकेला मृत घोषित करण्यात आले. जखमींमध्ये एका शालेय विद्यार्थ्याचा तसेच ट्रक चालकाचाही समावेश आहे.