Shocking! : In Jalgaon Laborer dies after falling from fifth floor जळगाव : इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने मजूर तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शेख उस्मान शेख ईस्माईल (40, रा.पिंप्राळा हुडको, जळगाव) असे मृताचे नाव आहे.
तोल जाताच तरुणाचा मृत्यू
मंगळवार, 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता गणेश कॉलनीतील चंद्रप्रभा सोसायटी येथे बांधकामाचे ठिकाणी शेख उस्मान कामाला आला होता. पाचव्या मजल्यावर काम करत असताना त्याचा तोल जाऊन थेट खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी 10 वाजता ही घटना घडली.
जिल्हा रुग्णालयात गर्दी
उस्मान खाली पडल्यानंतर तेथील कामगारांनी त्याला तातडीने उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळतात नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी केली. या संदर्भात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. दरम्यान, शहरातील अनेक बांधकामांच्या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमिवर, बांधकामाच्या ठेकेदारांनी योग्य ती सुरक्षा घ्यावी अन्यथा सुरक्षा घेत नसल्यास संबंधीत यंत्रणांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.