जळगावात माहेश्वरी समाजाचे परिचय संमेलन उत्साहात
जळगाव । येथील माहेश्वरी विवाह सहयोग समितीतर्फे राज्यस्तरीय वधू-वर परिचय संमेलन आज उत्साहात पार पडले.
शहरातील आदित्य लॉन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या सभाध्यक्ष व माजी महापौर नितीन लढ्ढा, डॉ. सुभाष लोहीया मेहकर, जीएसटी विभाग असिस्टंट कमिशनर मेहुल इंदाणी उपस्थित होते. मंचावर संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण बेहेडे, अध्यक्ष श्यामसुंदर झंवर, उपाध्यक्ष सुभाष जाखेटे, सहखजिनदार विवेकानंद सोनी, प्रकल्पप्रमुख वासुदेव बेहेडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. बी. जे. लाठी, प्रतिभा जाजू यांनी केले. यावेळी महेशवंदना सायली झंवर, पुजा सोमाणी, मनिषा झंवर, वैष्णवी झंवर, यांनी सादर केली. या रजत मोहत्सवी कार्यक्रमात ५५० वधुवरांनी नोंदणी करण्यात आली. यावेळी ३०० पेक्षाजास्त वधू-वरांनी आपला परिचय करून दिला. दरम्यान, नोंदणी केलेल्या वधूवरांच्या पुस्तकाचे तसेच रजत महोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येवून या पुस्तीकेच्या प्रतींचे उपस्थितांमध्ये वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी समितीचे सर्व सदस्य तसेच शहरातील माहेश्वरी बांधवांनी कामकाज पाहिले.